
पुणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस), अपंग विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती आता राज्य शासनाच्या शिक्षण योजना संचालनालयातर्फे राबवल्या जात आहेत. या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.शिक्षण योजना संचालनालयाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिष्यवृत्ती योजनांची माहिती, पात्रतेचे निकष आणि अर्ज http://www.scholarships.in या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याचा धर्मनिहाय कोटा २,८५,४५१ निश्चित केला आहे. सद्यस्थितीत ३ लाख ८२ हजार ५१४ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच नुतनीकरणासाठी ७ लाख २४ हजार ४९५ अर्ज नूतनीकरणासाठी प्राप्त झाले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना एक हजार ते दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी आतापर्यंत ७५ हजार ८४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना नववीसाठी पाच हजार आणि दहावीसाठी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी खाजगी, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, शासनाच्या वसतिगृहाच्या सवलती घेणारे विद्यार्थी पात्र ठरत नाहीत. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ शासकीय किंवा अनुदानित
शाळेमध्ये नियमित आणि पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळतो. निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना सात ते अकरा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
सर्व योजनांसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. तसेच नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी नमूद केले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

