
मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे तपास करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसाधारण मंजुरी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने पुन:प्रस्थापित केल्यामुळे आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्यातील १६८ प्रकरणांत चौकशी सुरू करता येणार आहे. या प्रकरणांत तब्बल २९ हजार ४० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये एकेकाळी भरभराटीला असलेल्या बुडीत विमान कंपनीच्या मालकाच्या प्रकरणाचा समावेश आहे.सदर बुडीत विमान कंपनीच्या मालकाविरुद्ध एका ट्रॅव्हल कंपनीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा दाखल केला होता. मात्र या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित विमान कंपनी मालकाचा संबंध नसल्याचा अहवाल दिला. याच गुन्ह्यावरून काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तपास करीत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाला आक्षेप घेत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे अपील फेटाळले. मात्र विद्यमान सरकारने आता सीबीआयला आवश्यक असलेली सर्वसाधारण मंजुरी सरसकट देऊन टाकल्यामुळे या विमान कंपनी मालकाच्या प्रकरणात सीबीआयच्या आर्थिक गुन्हे विभागाला चौकशी करता येणार आहे. सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयालाही पुन्हा चौकशी करता येणार आहे.
या विमान कंपनी मालकाच्या १९ कंपन्या असून त्यापैकी पाच कंपन्या परदेशात आहेत. भारतात झालेल्या घोटाळ्याची रक्कम या परदेशी कंपन्यांमध्ये वळविल्याचा प्रमुख आरोप आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सीबीआयचे राज्यातील तपासाचे अधिकार काढून घेण्यात आल्यामुळे गेले दोन वर्षे या प्रकरणी सीबीआयला काहीही करता आले नव्हते. आता या प्रकरणात सीबीआयच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू केली जाणार असून सदर विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले.
याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १७-अ नुसार राज्यातील वेगवेगळ्या १०१ प्रकरणांत २३५ सरकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीचा मार्गही आता मोकळा होणार आहे. केंद्रीय आस्थापनांशी संबंधित हे अधिकारी असले तरी ते प्रतिनियुक्तीवर राज्य सरकारच्या सेवेत असल्यामुळे सीबीआयला राज्य शासनाची सर्वसाधारण मंजुरी आवश्यक असते. ती मंजुरी महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी काढल्याने या सरकारी अधिकाऱ्यांना अभय मिळाले होते.
सर्वसाधारण मंजुरी म्हणजे काय?
दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा १९४६ नुसार दिल्ली पोलिसांची विशेष शाखा असा सीबीआयला दर्जा आहे. त्यामुळे साहजिकच दिल्लीपुरता तपासाचा अधिकार आहे. दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायद्यातील कलम ६ अन्वये सीबीआयला तपास करताना संबंधित राज्याची मंजुरी असणे आवश्यक आहे. सर्व राज्यांकडून ती दिली जाते. परंतु ती राज्याला काढून घेता येते. राज्यात भाजपविरोधी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर २१ ऑक्टोबर २०२० रोजी ही सर्वसाधारण मंजुरी काढून घेतली होती. त्यामुळे सीबीआयच्या तपासावर निर्बंध आले होते.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
