पुणे : महाविद्यालयाच्या वसतिगृहात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; हडपसर भागातील घटना

पुणे : महाविद्यालयाच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहात तरुणीला धमकावून एकाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी हडपसर भागातील एका शिक्षण संस्थेत शिकत आहे. तक्रारदार तरुणी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायला आहे. वसतिगृहातील प्रसाधनगृहात तरुणी गेली. त्या वेळी आरोपी प्रसाधनगृहात गेला. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक लांभाते तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *