
लातूर : निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले यामुळे १९९३ मधील भूकंपाच्या कटू आठवणींना उजाळा मिळाला आहे. गेला महिनाभरापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात जमिनीखालून आवाज येत होता. जमीन हादरल्यासारखी स्थिती होते व हा आवाज म्हणजे भूकंपाचा धक्का आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे तक्रार केली व प्रशासन आपले म्हणणे गांभीर्याने घेत नसल्याचे सांगितले. आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे बोलणे करून दिले .फडणवीस यांनी प्रशासनाला या बाबी गांभीर्याने पाहा व लोकांच्या मनातील भीती दूर करा अशा सूचना केल्या. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र दिल्ली येथील दोन शास्त्रज्ञांचे पथक हासोरी परिसरात दाखल झाले व या पथकाने सर्व पाहणी केली. नोंदी घेतल्या.
भूकंपाच्या सूक्ष्म नोंदी व्हाव्यात यासाठी निलंगा तालुक्यातील औराद व औसा तालुक्यातील आशिव या गावात भूकंपमापन यंत्र बसवले व त्या यंत्रावर सप्टेंबर महिन्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसल्याची नोंद झाल्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी सांगितले. १२ सप्टेंबर रोजी २.२ रिश्टर स्केलचा धक्का, १५ सप्टेंबर रोजी १.३ रिश्टर स्केलचा तर २३ सप्टेंबर रोजी २ रिश्टर स्केलचा धक्का बसल्याचे भूकंपमापक यंत्रात नोंद आहे. डॉक्टर अजयकुमार वर्मा यांनी लातूर हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन -३ मध्ये येतो.
खबरदारी काय घ्याल?
तेरणा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये थोडा भूकंपाचा धोका जाणवतो, नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे. भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत. पत्र्याचे घर असेल तर पत्र्यावर लाकूड अथवा दगड वजन म्हणून ठेवू नये किंवा घरामध्ये खुंटीला शेतातील अवजारे अडकवून ठेवू नयेत. त्यामुळे हानी होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. हासोरी परिसरात सुमारे पाच किलोमीटर जमिनीखालून भूगर्भात हालचाली होत्या, ज्या भागात पाण्याचा अतिउपसा होतो त्या भागात असे जमिनीखालून आवाज होऊ शकतात, त्यातील ते एक कारण आहे.
जमिनीत खाली केवळ पाच किलोमीटर अंतरावर हालचाली असल्यामुळे आवाज होता, त्या खालच्या बाजूला पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर या हालचाली झाल्या असत्या तर त्याचा तेवढा धोका किंवा गांभीर्य लोकांना जाणवले नसते असे वर्मा म्हणाले. ३० सप्टेंबर १९९३ ते २०२२ या कालावधीत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ५३ भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद आहे. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५, २००३ मध्ये ५, २००४ मध्ये ७ धक्के बसले. २०१२ ते २०२२ या काळात २१ धक्क्यांची नोंद भूकंपमापन यंत्रावरती आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यातच भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. १९९३ प्रमाणेच या वर्षी जास्त पाऊस होता त्यामुळे लोकांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भूकंपानंतर लातूर, उस्मानाबाद व सर्वच परिसरांत भूकंपरोधक घरे बांधली पाहिजेत यासाठी शासन आग्रही होते. लातूर व परिसरातील बांधकामांना परवानगी देताना बांधले जाणारे घर भूकंपरोधक आहे की नाही याची काळजी घेतली जात होती. ९३ चा भूकंप होऊन बराच कालावधी उलटून गेल्यामुळे ही काळजी घेण्याचे प्रशासन व जनता दोघेही विसरले. आता बांधकाम परवानगी न घेता करण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे ते भूकंपरोधक होत आहे की नाही हे पाहण्याची तसदी घेतली जात नाही.
शासनाच्या वतीने गरिबांना म्हाडा व विविध योजना अंतर्गत घरे बांधून दिली जातात ,बांधून दिली जाणारी घरे तरी भूकंपरोधक आहेत का ? याबाबत निश्चित माहिती सांगण्यास प्रशासन धजावत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ही बांधकामे भूकंपरोधक होत नाहीत. आपल्याकडे बैल गेला आणि झोपा केला अशी सवय आहे. एखादी आपत्ती घडून गेल्यानंतर त्याची कारणमीमांसा सांगितली जाते व त्यानंतर लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जाते. प्रशासनाने आता तरी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या लोकांची सुरक्षितता गांभीर्याने घेतली पाहिजे. बांधली जाणारी घरे ही भूकंपरोधक आहेत का जे कच्चे बांधकाम आहेत त्यात लोक राहत आहेत का? याबाबतीत सर्वेक्षण करून लोकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




