
लंडन : इतिहासात ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घ काळ विराजमान असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वृद्धापकालाने निधन झाले. वयाच्या ९६व्या वर्षी स्कॉटलंडमधील बाल्मोरल येथील प्रासादात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्कॉटलंडमधील सुटीकालीन प्रासादामध्ये आराम करण्यासाठी गेल्या असताना एलिझाबेथ यांची प्रकृती खालावली. याबाबत माहिती मिळताच राजघराण्याच्या सर्व सदस्यांनी स्कॉटलंडकडे धाव घेतली. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर बसतील. ते गुरूवारची रात्र स्कॉटलंडमध्येच राहणार असून शुक्रवारी लंडनला परतणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एलिझाबेथ यांचे नातू राजपुत्र विल्यम्स आणि हॅरीदेखील स्कॉटलंडमध्ये दाखल झाले.
७० वर्षांची कारकीर्द
दुसऱ्या महायुद्धानंतर १९५२ साली राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला. तब्बल ७० वर्षे त्यांनी देशाचे नेतृत्व केले. या काळात एलिझाबेथ यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे पाहिली. राष्ट्रकूल महासत्तेचा अस्त, शीतयुद्ध, युरोपियन महासंघात ब्रिटनचा प्रवेश आणि निर्गमन अशा अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या.
१५ पंतप्रधानांची नियुक्ती..
आपल्या कारकीर्दीत एलिझाबेथ यांनी तब्बल १५ पंतप्रधान बघितले. १८७४ साली जन्मलेल्या विस्टन चर्चिल यांच्यापासून ते १०१ वर्षांनी जन्मलेल्या लिझ ट्रस यांची नियुक्ती एलिझाबेथ यांनीच केली.
एक होती राणी..
किंग जॉर्ज सहाव्या यांच्या मृत्यूनंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राणी एलिझाबेथ राष्ट्रकूल देशांची राणी बनली. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आल्याने जराही न डगमगता आल्या प्रसंगाला ताठ मानेने राणी सामोरी गेली. १९५३ साली राणीच्या राज्याभिषेकाचे टीव्हीवरून प्रथमच प्रसारण करण्यात आले. किंबहुना या प्रसंगाचे औचित्य साधून अनेकांनी घरी टीव्ही विकत घेतले. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक मंदीमधून जाणाऱ्या इंग्लंडवर राज्य करताना राणीने बरेच चढ-उतार बघितले. हळूहळू इंग्लंडने औद्योगिकतेबरोबर ज्ञान-विज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात मोलाची प्रगती केली. ८० च्या दशकापासून इंग्लंडमधील राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतरे राणीने जवळून पाहिली
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


