
पुणे गणेशोत्सव २०२२ : पुण्यातील एका गणपती मंडळाच्या जिवंत देखाव्यावरुन वाद पेटला होता. अफझल खानाचा वध या जिवंत देखाव्याला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं नकाराचं कारण देण्यात आलं होतं. मात्र आता याच देखाव्याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास भारतात नाहीतर पाकिस्तानात दाखवायचा का? असा प्रश्न मंडळाकडून निर्माण करण्यात आला होता. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे या संदर्भात मेलद्वारे संपर्क करुन निवेदन पाठवलं होतं. अखेर मंडळाच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.
सध्या पुण्यात ब्राह्मण महासंघ अनेक प्रश्नांच्या बाबतीत चांगलंच सक्रिय झालं आहे. या देखाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी देखील आज कोथरुड पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिलं होतं. या देखाव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता होती. अनेक स्तरावर या देखाव्यासंदर्भात बोललं गेलं होतं. मात्र आता हे गणपती मंडळ अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा साकारणार असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे.
आदित्य ठाकरेंनीदेखील प्रश्न उपस्थित केला होता.
शिंदे फडणवीसांचं तत्पुर्त असलेल्या सरकारकडून वारंवार हिन्दूत्ववादी सरकार असल्याचं भाष्य केलं जात होतं. याच सरकारमध्ये जर शिवरायांच्या प्रतापाचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध होत असेल तर ही गोष्ट फार चिंताजनक आहे. स्वत:ला हिन्दूत्ववादी म्हणता मग महाराजांचा इतिहास दाखवायला विरोध का करता?, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
नक्की काय होतं प्रकरण?
पुण्यातील कोथरुडमधील संगम चौकातील गणपती मंडळ उत्तम आणि क्रिएटीव्ह देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या देखाव्याला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मंडळाला संबंधित देखावा उभारण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. देखाव्या वरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती. पुण्यात दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने होणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात होते मात्र पोलिसांकडून काही निर्णय नाकारण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजीचा होता
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


