
पुणे : राज्य शासनाकडून कोव्हिशील्ड लशीचा अत्यल्प पुरवठा झाल्याने महापालिकेच्या पाच रुग्णालये आणि प्रसृतीगृहांमध्येच कोव्हिशील्डची वर्धक मात्रा देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून विनामूल्य वर्धक मात्रा देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ६८ केंद्र निश्चित करण्यात आली होती. या केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड करोना प्रतिबंधक दोन्ही लशींची मात्रा देण्यास सुरुवात झाली. मात्र कोव्हिशील्ड लशीचा पुरवठा अत्यल्य होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, कसबा-विश्रामाबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कमला नेहरू रुग्णालय, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालय, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कै. जयाबाई सुतार दवाखाना, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कै. अण्णाभाऊ मगर रुग्णालय येथेच कोव्हिशील्डची वर्धक मात्रा दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिन लशीची वर्धक मात्रा यापूर्वी निश्चित केलेल्या केंद्रात दिली जाणार आहे.
शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना काॅर्बेव्हॅक्स लस तर १८ वर्षापुढील सर्व नागरीकांना पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या महापालिकेच्या ६८ दवाखान्यात लस दिली जाणार आहे, अशी माहिती लसीकरण प्रमुख डाॅ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या तसेच मागील तीन महिन्यात करोनाचा संसर्ग न झालेल्या व्यक्ती वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. घराच्या जवळील महापालिकेचा दवाखाना अथवा रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




