
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपसोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला राज्यातून संपवू पाहत आहे, हे वारंवार पक्षप्रमुखांच्या लक्षात आणून दिले होते, असे सांगत उध्दव ठाकरे यांना पूर्वकल्पना देऊन आणि त्यांच्याशी चर्चा करूनच आपण शिवसेना सोडल्याचे बारणे यांनी सांगितले.
शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्यानंतर खासदार बारणे शुक्रवारी पुण्यात आले असता, त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पत्रकारांशी बोलताना बारणे म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप-शिवसेनेची युती झाली पाहिजे. या मताशी लोकसभेतील शिवसेनेचे १२ खासदार सहमत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही ही भूमिका मांडली होती. २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. महाविकास आघाडी नंतरच्या काळात झाली. सत्तेत एकत्र असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे निदर्शनास आणून दिले होते. २०२४ च्या लोकसभेचा विचार करता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि राज्यात शिवसेना-भाजप युती असायला हवी. ही आमची भूमिका कायम आहे.
राज्यातील बहुतांश शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला संपवण्याचे राजकारण होत असल्याचे आणि महाविकास आघाडीबाबत फेरविचार करण्याचे आवाहन करत होते. मात्र, राष्ट्रवादीची आघाडी तोडण्यास पक्षप्रमुख तयार नव्हते. मात्र आम्ही पुढचा विचार करून भाजपसोबत राहणार आहोत. मावळ मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडण्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने त्यावर भाष्य केले नाही की विरोध दर्शवला नाही. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीच्या माध्यमातून निर्णय घेतील. २०२४ मध्ये मी मावळचा उमेदवार असणार आहे.
‘मुख्यमंत्र्यांचा पक्षप्रमुख होण्याचा मनोदय नाही’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षप्रमुख होण्याबाबत कोणताही मनोदय नाही. आम्ही भाजपसोबत जाण्याची जी भूमिका घेतली आहे त्याचे शेवटपर्यंत समर्थन करणार आहोत, असे श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या खासदारांना कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. सर्वाधिक निधीचा वापर राष्ट्रवादीकडून होत होता. खासदार संजय राऊत यांची कार्यपध्दती चुकीची आहे. रोज उठून कोणाच्या घरावर दगड मारण्याची आवश्यकता नसते, असे ते म्हणाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




