
मुंबई : सामान्यांच्या गृहप्रकल्पासाठी तीन-चार वर्षांपूर्वी जांभूळ येथे खरेदी केलेला ३५ एकर भूखंड पडून असतानाच कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक घोटाळय़ात अडकलेल्या सहारा इंडियाचा धानोरी येथील ५२ एकर भूखंड ३७६ कोटींना खरेदी करण्याचे पुणे म्हाडाने ठरविले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला प्राधिकरणाने मंजुरी दिली असली तरी या प्रस्तावात त्रुटी आहेत, असे कारण देऊन शासनाने हा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. भूखंडाच्या मालकीबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच हा भूखंड म्हाडाच्या नावावर होण्यास काहीच अडचण नाही, असे पुणे म्हाडाचे म्हणणे आहे.
जांभूळ येथील ३५ एकर भूखंडासाठी रेडी रेकनरच्या तीन पट रक्कम मोजणाऱ्या म्हाडाने धानोरीतील भूखंडासाठी मात्र तेवढी किंमत मोजलेली नाही. धानोरीतील या भूखंडाचा फायदा म्हणजे पुणे रेल्वे स्थानक नऊ किलोमीटरवर तर पुणे विमानतळ तीन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी सहारा इंडियाच्या मालकीचा १०७ एकर भूखंड आहे. यापैकी ५२ एकर भूखंड म्हाडाने खरेदी करण्याचे ठरविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहारा इंडियाला मालमत्ता विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे, याचा फायदा उठवून म्हाडाने हा मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड भविष्यातील गृहप्रकल्पासाठी खरेदी करण्याचे ठरविले आहे, असे पुणे गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी सांगितले.
या ५२ एकर भूखंडाच्या मालमत्ता पत्रकावर कन्ट्री रिट्रीट १ (२२ एकर), तन्ना ग्रीन (२५ एकर), सहारा प्राइम सिटी (सहा एकर), अमृत विहार (सात एकर) अशी नावे आहेत. मात्र हे सर्व भूखंड सहाराच्या मालकीचे आहेत, असेही माने यांनी सांगितले. या भूखंडाबाबत पुण्यातील प्रतिष्ठित विकासक तसेच वकील यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला आहे. जांभूळ येथील भूखंड हा पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या हद्दीत असून पुण्यापासून खूप दूर आहे. त्या तुलनेत धानोरी परिसर पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. पुणे म्हाडाकडे असलेल्या एकूण ६३० हेक्टर भूखंडापैकी ५९६ हेक्टर भूखंडाचा वापर करण्यात आला आहे. शिल्लक राहिलेल्या ३४ हेक्टर भूखंडापैकी काही भागांवर आरक्षण तर काही प्रकरणांत न्यायालयीन लढाई सुरू आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत म्हाडाकडे भूखंडच नसल्यामुळे गेली १५ वर्षे एकही योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळेच सहाराचा हा भूखंड फायदेशीर ठरणार आहे, असा दावा माने यांनी केला आहे.
धानोरी येथील बाजारभाव रेडी रेकनरच्या दोन ते तीन पट आहे. याशिवाय तीन इतके चटईक्षेत्रफळ मिळणार असल्यामुळे म्हाडाला घरनिर्मितीतून भरपूर फायदा मिळणार आहे. भूखंड संपादनाच्या नव्या कायद्यानुसार शहरातील भूखंडाला रेडी रेकनरच्या तीन पट दर द्यावा लागतो. परंतु सहाराकडून रेडी रेकनरच्या दरानुसार भूखंड मिळणार आहे.
– नितीन माने, मुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण मंडळ
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




