
देशात राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाने आपला उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते जयराम रमेश, डी. राजा, टी. आर. बालू, रामगोपाल यादव, सीताराम येच्युरी इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीत विरोधी पक्ष राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत आपली रणनीती निश्चित करणार आहे. भाजपाला शह देण्यासाठी हे सर्व नेते चर्चा करतील आणि मग सर्वसहमतीने निर्णय घेण्यात येणार आहे.
जगदीश धनखड भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड हे भाजपचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर शनिवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ‘‘उपराष्ट्रपती पदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली, पण ‘शेतकरीपुत्र’ धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले,’’ असे नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धनखड यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार म्हणून धनखड यांना संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा रंगली होती, मात्र देशाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने धनखड यांची निवड योग्य असल्याचे नड्डा म्हणाले.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये धनखड यांना पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते सातत्याने वादात राहिले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी विविध राजकीय व प्रशासकीय मुद्दय़ांवरून तीव्र मतभेद झाले. बॅनर्जी यांनी धनखड यांच्यावर हवाला प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला होता व त्यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली होती. मात्र, ममतांच्या आक्रमक भूमिकांना धनखड प्रत्युत्तर देत असल्याने केंद्र सरकारने त्यांच्या कारभारात कोणतीही दखल दिली नसल्याचे मानले गेले. ‘‘मी संघाशी निगडित नाही. पण संघाशी माझे संबंध जोडले गेले तर मला आनंद होईल आणि हे सांगण्यात मला काहीच संकोच वाटत नाही,’’ असे धनखड यांनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.
कोण आहेत जगदीश धनखड?
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले धनखड तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहिले आहेत. राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील दुर्गम गावातून आलेले धनखड राजस्थान उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयातील यशस्वी वकील होते. त्यानंतर १९८९ मध्ये धनखड जनता दलाच्या तिकिटावर झुनझुनू लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी १९९० मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री पदही सांभाळले. १९९३ मध्ये राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य बनले. २०१९ मध्ये मोदी सरकारने त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवले.
लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीची निवड करतात. लोकसभेत भाजपकडे पूर्ण बहुमत असून राज्यसभेत ‘एनडीए’तील घटक पक्ष तसेच बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांच्या मदतीने धनखड विजयी होऊ शकतात. १९ जुलै, मंगळवारी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असून ६ ऑगस्ट रोजी मतदान होईल.
शहर
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
महाराष्ट्र
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.


























Subscribe to my channel



