पुणे : उतारावर लावलेला ट्रॅक्टर दुचाकींवर आदळला : बिबवेवाडीतील घटना; नऊ दुचाकींचे नुकसान

पुणे : उतारावर लावण्यात आलेला ट्रॅ्क्टरच्या धडकेने नऊ दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे.

या प्रकरणी ट्रॅक्टरचालक रमेश देवीदास राठोड (वय ३७, रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्या विरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अप्पर इंदिरानगर येथील बस डेपोसमोर उतार आहे. उतारावर ट्रॅक्टर लावून राठोड दुपारी अडीचच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेला. त्या वेळी अचानक ट्रॅक्टर पुढे गेला आणि काही अंतरावर लावण्यात आलेल्या दुचाकींवर आदळला. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *