पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन

पुणेः पुण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. निलेश भाऊसाहेब पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पाटील हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास औंध येथील नगरस रस्त्यावरील 'सुवर्णयोग सोसायटी'मधील आपल्या राहत्या घरात त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस दलात हळहळ आणि तपासाची चक्रे वेगवान: घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, गुन्हे शाखेच्या पथकाने आणि फॉरेन्सिक टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनास्थळाची कसून पाहणी करण्यात येत आहे. या पोलीस अधिकाऱ्याने नेमक्या कोणत्या कारणातून किंवा नैराण्यातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक कलह, मानसिक ताणतणाव, कामाचा अतिभार किंवा इतर काही वैयक्तिक कारणे यामागे आहेत का, या सर्व बाबींचा पोलीस নিखालस तपास करत आहेत.

पोलिसांच्या अंतर्गत वर्तुळात अशा प्रकारे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याने स्वतःचे जीवन संपवल्यामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत असून, या घटनेचा पोलीस यंत्रणेकडून सखोल तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *