पुणे: कारेगाव (ता. शिरूर) येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लॅटवर कामाला गेलेल्या एका इसमावर अज्ञात व्यक्तीने पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी घडली. या गोळीबारात हमजा उस्मान शेख (वय ३९, सध्या रा. कारेगाव, मूळ रा. धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा मृत्यू झाला. या घटनेने कारेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मृताची पत्नी अबिताबी हामजा शेख (वय ३७) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हमजा शेख हे नेहमीप्रमाणे सकाळी साईनगर येथील समु इंटरप्रायजेस अॅक्वा रिच या पाण्याच्या प्लॅटवर कामासाठी गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने पिस्तुलातून त्यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू
या हत्येमागील नेमके कारण अद्याप पूर्णपणे अस्पष्ट आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून, जुन्या वादातून की सुपारी देऊन (Contract Killing) घडवून आणला गेला आहे, याविषयी पोलीस कसून तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस दल आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले असून त्यांची कसून छाननी सुरू आहे. फुटेजमध्ये दुचाकीवर आलेले संशयित हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असून, त्यांच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत. भर दिवसा घडलेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे पुढील तपास करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शहर
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- रत्नागिरी: सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्यात पुन्हा उफाळला वाद; नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!


























Subscribe to my channel




