मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आगामी काळासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी राजकीय घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचा कारभार आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींविरोधात येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत एक भव्य आणि विशाल संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा या दोन्ही नेत्यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली. या ऐतिहासिक आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मोर्चीची रूपरेषा आणि नियोजन:

प्राप्त माहितीनुसार, हा संयुक्त मोर्चा ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास कंपनी (Richardson & Cruddas) गेट येथून सुरू होईल. हा मोर्चा मार्गक्रमण करत मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयाजवळ पोहोचेल आणि तिथे या मोर्चाचे मोठ्या जाहीर सभेत रूपांतर होईल. या सभेद्वारे ठाकरे बंधू उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आपली आक्रमक भूमिका मांडणार आहेत. विशेष म्हणजे, हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय (नॉन-पॉलिटिकल) असणार असून या मोर्च्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा वापरला जाणार नाही, तर सर्वांच्या हातात केवळ देशाचा तिरंगा झेंडा असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

मतदारांच्या अपमानाचा मुद्दा आणि ठाकरे बंधूंची आक्रमक भूमिका:

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "आजपर्यंत झालेला हा मतदारांच्या मतांचा आणि लोकशाहीचा अनादर व अपमान आहे. निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि मतदार अहोरात्र मेहनत घेत असतात, परंतु जर अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत छेडछाड केली जाणार असेल, तर ती लोकशाहीला काळीमा फाडणारी बाब आहे. हा लढा केवळ कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून लोकशाही वाचवण्यासाठीचा आहे." त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी तसेच सामान्य जनतेने या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन ठाकरे बंधूनी केले आहे.

दरम्यान, जर ४ ऑक्टोबरच्या या मोर्चानंतरही निवडणूक आयुक्तांनी किंवा आयोगाने योग्य पावले उचलली नाहीत, तर सर्व समविचारी पक्ष एकत्र बसून पुढील तीव्र रणनीती ठरवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या संयुक्त आंदोलनामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *