
Mumbai : राज्य महामार्ग परिवहन अर्थात एसटीच्या ताफ्यात लवकरच ८,३०० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. करोनाकाळापूर्वी एसटीच्या ताफ्यात जवळपास १९ हजार बसेस होत्या, मात्र २०२४ वर्षाअखेरच बसची संख्या १२,६०० पर्यंत रोडावली. परंतु, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला.
सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. त्या अनुषंगाने बस गाड्यांची संख्या वाढल्यावर प्रवासी वाढून पर्यायाने उत्पन्न वाढेल, असा विश्वास परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
एसटी महामंडळाचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये, तर उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. म्हणजेच, महामंडळाची रोजची तूट एक ते दीड कोटीं रुपयांच्या घरात आहे. परंतु, ही तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी निर्णय घेतला आहे.
करोनापूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. त्यातून दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, करोनाकाळ आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी, २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. परंतु, राज्य सरकारने महिलांना तिकिटात निम्मी सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला असून, सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. यातून अनेक मार्गांवर एसटीच्या फेऱ्या आता अपुऱ्या पडत आहेत.
‘एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य सरकारची तत्त्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत. त्यामध्ये तीन हजार बस या ‘३ बाय २’ रचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने दाखल होतील. या बसना ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांचे नाव देण्यात आले असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर धावतील. तर, पाच हजार साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी १०० मिडी बसेस तसेच २०० अत्याधुनिक बसेसही विकत घेण्यात येणार आहेत. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी या सर्व बसेस ताफ्यात आल्यावर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे’, असे सरनाईक म्हणाले.
नवीन बस आल्यावर उत्पन्न निश्चित आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल. ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या, आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा, दोन शहरांदरम्यान गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या, या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी 'लाल परी' आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. वर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल. -प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




