मुंबईकरांसाठी मुंबई लोकलसोबत जीवनवाहिनी ठरत असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. मुंबईकरांच्या प्रवासाला गती देणाऱ्या मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली) मार्गिकेला आज तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये अचानक बिघाड झाल्याने ही सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या १५ ते २० मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकातच उभी आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या दरम्यान मुंबई मेट्रोच्या दहिसर ते गुंदवली या मार्गावर बिघाड झाला. दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या १५ मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकातच रखडली आहे. या बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) तातडीने हालचाली सुरू केल्या. गुंदवली स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अचानक सेवा ठप्प झाल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या बिघाडामुळे संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकप्रिय मार्गिकेला तांत्रिक ग्रहण
दरम्यान मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकांना मुंबईकरांनी अल्पावधीतच पसंती मिळाली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल ४४.२६ लाख प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. दररोज सरासरी १.४७ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. विशेषतः गुंदवली, मागाठाणे आणि अंधेरी पश्चिम या स्थानकांवर प्रवाशांचा मोठा भार असतो. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील (WEH) वाहतूक कोंडी २५ टक्क्यांनी आणि लोकल ट्रेनचा भार १५ टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, अशा वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवासी पुन्हा रस्ते वाहतुकीकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने अलीकडेच मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आजच्या या तांत्रिक समस्येमुळे मेट्रोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
[embedded content]
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!

























Subscribe to my channel


