प्रफुल्ल पटेल, रोहित पवार, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Praful Patel on Rohit Pawar: अजितदादांच्या अकाली एक्झिटने अनेकांना चटका लागला आहे. तर विमान अपघातात काळंबेरं असल्याचा आरोपही होत आहे. रोहित पवार यांनी दुसर्या पत्रकार परिषदेत विमानाचा अपघात की घातपात हा मुद्दा लावून धरला. त्यांनी या अपघातातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आणल्या. त्यांनी यापूर्वी ज्या काही शंका व्यक्त केल्या. त्यातील काही मुद्यावरून राजकारण तापलं आहे. तर 27 जानेवारी रोजी पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला. एका महत्त्वाच्या फाईलवर दादांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने दादांना निघायला उशीर झाला आणि दुसर्या दिवशी दादांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित पवार म्हणाले होते. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी कोणत्या विषयासंदर्भात अजितदादांशी चर्चा केली याची माहिती दिली.
याविषयावर झाले दादांशी बोलणे
प्रफुल पटेल आणि अजित पवार यांचं विमान अपघाताच्या दिवशी कोणत्या विषयांवर बोलणं झालं ते सांगितलं आहे. अपघात होण्याच्या आदल्या दिवसी आपण अजित दादांशी फोनवरून संवाद साधला होता. अजित दादांचा अपघात होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन केला होता असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांनी आज प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत होतो तेव्हा शेतकर्यांच्या धानाच्या चुकाराच्या संदर्भात मी त्यांना फोन केला होता तर दादांनी त्यावर चुकाऱ्यांची व्यवस्था करतो असं म्हटलं अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
पुरावे असतील तेव्हाच बोलणार
तररोहित पवारांनी केलेल्या आरोपावर प्रफुल्ल पटेल यांची सावध प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर एक हादरवणारा आरोप केला. पायलटने अजित दादांचे विमान मुद्दाम खाली आपटलं आणि स्फोट घडवला असा आरोप त्यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सीबीआय चौकशी केली मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आणि अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली. ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे .राज्य सरकार सुद्धा तपास करत आहेत. परंतु यामध्ये अनेक लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अचानकपणे एवढी मोठा दुर्घटना कशी होऊ शकते याची सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी आणि ही महाराष्ट्रात घटना झाल्यामुळे राज्य सरकार याबाबत सीबीआयला चौकशी करण्यात सांगू शकते आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही काल निवेदन देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे असे पटेल म्हणाले.
ब्लॅक बॉक्सबाबत मोठी माहिती
AAIB स्वायत्त संस्था चौकशी करत असल्याने ब्लॅक बॉक्स संदर्भात मला अधिक माहिती नाही. मात्र ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याची प्राथमिक माहिती आहे असे म्हणत त्यावर अधिक बोलणं प्रफुल्ल पटेल यांनी टाळलं.
सध्या राष्ट्रवादीच्या विलगीकरणावर कोणतीही चर्चा नाही
राष्ट्रवादी विलगीकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की अजित दादाच्या निधनानंतर आम्हाला याच्यातून सावरायचे आहे. आम्हाला विलगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही अशी स्पष्ट भूमिका प्रफुल पटेल यांनी मांडली. तसेच आमच्या पक्षाच्या बाबत अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवले आहेत. परंतु येणार्या 26 तारखेला विधिमंडळाची नेते, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी याच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
[embedded content]
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




