अनोळखी लोकांशी संवाद साधणे हे एकेकाळी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. पण तंत्रज्ञानाने ते संपवले आहे. आवडो वा न आवडो, हे सत्य आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जा. एकमेकांना अभिवादन करण्याऐवजी आपसात भिडतो आणि मग भांडणाच्या भीतीने आपण नजरानजर होऊ न देता “सॉरी’ म्हणतो. गेल्या आठवड्यात मी अशाच परिस्थितीत होतो. सर्व फ्लाइट खूप उशिरा धावत होत्या. विमानतळावरील लाउंजमध्ये लोकांची गर्दी होती. अन्न संपण्यापूर्वी एकदाचे लंच आटोपावे, असा विचार ते करत होते. माझी नजर 2 बाय 2 टेबलकडे गेली. एका व्यक्तीचे आधीच लंच सुरू होते. आता टेबलावर केवळ ग्लास ठेवण्यापुरतीच जागा राहिली होती. दुसऱ्या व्यक्तीच्या प्लेटसाठी तेथे जागाच नव्हती. मग दोन लोकांना एकत्र जेवायचे असेल तर त्यांनी आपली ताटे कुठे ठेवायची, असा प्रश्न होता. पहिल्या व्यक्तीकडे एक ग्लास पाणी, दही आणि एक कप मिठाई असली तरी दुसरा कुणी अनोळखी त्याच टेबलावर बसण्याची हिंमत करणार नाही. कारण येथे जागा कुठे आहे, असा आेरडा खावा लागेल याची इतरांना कल्पना होती. तेवढ्यात मला अशाच एका टेबलावर एक रिकामी खुर्ची दिसली. माझ्या नजरेने तिथे बसलेल्या व्यक्तीचे निरीक्षण केले. माझ्या अनुभवी मनाने तो एक तमिळ आहे. त्याच्याशी तमिळमध्ये बोला, असे सांगितले. कदाचित माझ्या मेंदूने त्याच्या कपाळावरील विभूती पाहून हे सुचवले असावे. इतर कोणत्याही भेसळीविना मी शुद्ध तमिळमध्ये बोलू लागलो. आनंदाने त्यांनी स्वत:ची प्लेट हलवली. कारण टेबलावर त्यांना दुसरा शाकाहारी सापडला. त्या क्षणापासून नवी मुंबईतील नेरूळ येथील भगवान मुरुगन (भगवान गणेशाचा भाऊ) मंदिराचे सचिव के. गणेशन माझे मित्र बनले. मंदिरात येणाऱ्या शेकडो भक्तांशी ते जोडलेले आहेत. त्यामुळे कामे करून घेण्याचे त्यांचे नेटवर्किंग कौशल्य माझ्यासारख्या संगणकावर कथा लिहिणाऱ्यापेक्षा अनेकपटीने जलद व प्रभावी आहे. मी लवकरच प्रकाशित होणाऱ्या एका पुस्तकाचा आढावा वाचत असताना मला या घटनेची आठवण झाली. त्याचे शीर्षक आहे “वन्स अपॉन अ स्ट्रेंजर: द सायन्स ऑफ हाऊ “स्मॉल’ टॉक कॅन ॲड अप टू अ बिग लाइफ.’ हे ससेक्स विद्यापीठातील मानसशास्त्राच्या असोसिएट प्रोफेसर आणि ससेक्स सेंटर फॉर रिसर्च ऑन काइंडनेसच्या संचालक डॉ. गिलियन सँडस्ट्रॉम यांनी लिहिले आहे. त्या छोट्या सामाजिक संवाद आणि कल्याणात तज्ज्ञ आहेत. सँडस्ट्रॉम यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कॉफी शॉपमध्ये बरिस्तासोबत १० सेकंदांचे संभाषणदेखील आपली समुदायाची भावना मजबूत करू शकते आणि सकारात्मकता वाढवू शकते. त्यांच्या संशोधनाचा सारांश असा आहे की लहान संभाषणे महत्त्वाची आहेत. आज आपल्याला त्यांची गरज आहे. आठवून पाहा. आपण वेळ आणि रस्ता विचारणे कित्येक वर्षांपासून थांबवले आहे. एवढेच नव्हे तर एकमेकांना हसून अभिवादन करणेदेखील थांबवले आहे. हे आपण दुसऱ्या व्यक्तीचा आदर करत नाही म्हणून नाही तर आपण सतत आपल्या फोनवर असतो म्हणून आहे. विमान, ट्रेन, लग्न किंवा सामाजिक मेळाव्यात प्रियजनांना भेटणे आता भूतकाळातील गोष्ट आहे. सँडस्ट्रॉम यांच्या संशोधनातून असेही दिसून आले की, मी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी काय बोलावे, अशी चिंता वाटणाऱ्या विशीतील तरुणांच्या तुलनेत वृद्धांमध्ये चिंता कमी असते. त्यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की अनोळखी किंवा ओळखीच्या लोकांशी लहान, वरवरच्या संभाषणांमुळेही खोल आणि चिरस्थायी सामाजिक संबंध निर्माण होऊ शकतात. 9 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की अशा लहान संभाषणांमुळे आपला आनंद वाढतो, एकटेपणा कमी होतो आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे लहान संभाषणे निरुपयोगी असतात किंवा वेळेचा अपव्यय असतात ही धारणा खोटी ठरते. फंडा असा की- आठवड्यातून एकदा तुमचा फोन घरी सोडून मॉल, पार्क किंवा सामाजिक ठिकाणी जा. कुणाशी तरी थोडक्यात संभाषण करा. कुणास ठाऊक ते कदाचित तुमच्या समस्या सोडवतील. या संभाषणातून तुमच्या आयुष्यात मोठा बदलही घडून येईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : लुल्लानगर ब्रिजवरील गायब झालेला डिव्हायडर; नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची कारवाई
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
महाराष्ट्र
- डॉ. राम चरण यांचा कॉलम:बैठक घेणेदेखील कौशल्य ,त्यावर चांगले काम करावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सोशल मीडियाच्या युगात भक्ती, योगाचे महत्त्व वाढले
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
गुन्हा
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
- डॉ. राम चरण यांचा कॉलम:बैठक घेणेदेखील कौशल्य ,त्यावर चांगले काम करावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सोशल मीडियाच्या युगात भक्ती, योगाचे महत्त्व वाढले
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती

























Subscribe to my channel


