इतर अनेक व्यवसायांप्रमाणेच प्रकाशन आणि मुद्रणव्यवसाय क्षेत्र त्याच्या आरंभापासूनच पुरुषांच्या मक्तेदारीचे क्षेत्र होते. महाराष्ट्रात या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अग्रेसर स्त्री प्रकाशकांच्या कामाचा थोडक्यात आढावा घेण्याचे काम ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ हे पुस्तक करते. भारतात अगदी सुरुवातीला काम करणाऱ्या ज्या स्त्री प्रकाशकांमुळे हे क्षेत्र सर्वच स्त्रियांसाठी खुले झाले, त्या अखिल भारतीय पातळीवरील मोजक्या प्रकाशकांच्या कार्यावरही हे पुस्तक प्रकाश टाकते. नाशिक येथील प्रा. डॅा. प्रवीण घोडेस्वार हे त्यांच्या वैविध्यपूर्ण वृत्तपत्रीय स्तंभलेखनासाठी प्रसिद्ध आहेत व त्यांच्या अनेक ग्रंथांमधून त्यांनी स्त्रियांबद्दल आस्थेने चिंतनपर, वैचारिक, चरित्रपर, माहितीपर लेखन केले आहे. जर्मनीमध्ये ‘मेंझ’ या गावात 1440 मध्ये गटेनबर्ग नावाच्या गृहस्थाने पहिल्या छापखान्याचा शोध लावला. यानंतर मुद्रण व छपाईचे तंत्र सर्वदूर कसे पसरले?, ते भारतात केव्हा आले?, महाराष्ट्रात केव्हा पोहोचले?, मराठीत छापला गेलेला पहिला ग्रंथ कोणता?, प्रकाशनाच्या कार्यात महिलांचे स्थान काय होते आणि आज काय आहे? असा या कामाचा धावता इतिहास डॅा. वंदना महाजन यांनी प्रस्तावनेत सादर केला आहे. तो पुस्तकविषयास अनुसरूनच आहे. डॅा. वंदना महाजन मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका आहेत व तो भारदस्तपणा त्यांच्या प्रस्तावनेत जाणवतो. भारतातील पहिली स्त्रीवादी प्रकाशन संस्था असणारी ‘काली फॅार वुमेन’च्या उर्वशी बुटालिया आणि रितू मेनन यांनी पुढे ‘जुबान बुक्स’ आणि ‘वुमेन अनलिमिटेड’ या संस्था काढल्या. ‘जगरनॅाट’च्या चिकी सरकार, ‘पेंग्विन रॅंडम हाऊस इंडिया’च्या मिली ऐश्वर्या, ‘टेथिस बुक्स’च्या नीता गुप्ता, ‘वेस्टलॅंड बुक्स’च्या कार्तिका व्ही. के. या मातब्बर इंग्रजी प्रकाशकांबद्दल या पुस्तकात माहिती मिळते. ‘मैत्री’ प्रकाशनच्या मोहिनी कारंडे, ‘राजेंद्र’ प्रकाशनच्या नीलिमा कुलकर्णी, ‘संस्कृती’ प्रकाशनच्या सुनीता राजेपवार, ‘स्नेहवर्धन’च्या डॅा. स्नेहल तावरे, ‘शब्दालय’च्या सुमती लांडे , ‘दिलीपराज’च्या मधुमिता बर्वे, ‘मुक्ता’च्या सारिका उबाळे, ‘मिहाना’च्या अमृता कुलकर्णी परिचारक, ‘डिंपल’च्या नम्रता मुळे, ‘अक्षर’च्या मीना कर्णिक अशा कित्येक कर्तबगार महिला प्रकाशकांच्या कामाचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकाला लाभलेल्या प्रकाशकही धडाडीच्या महिला भाग्यश्री पाटील-कासोटे या आहेत. पुस्तक प्रकाशनाची शतकपूर्ती नुकतीच साजरी करणाऱ्या भाग्यश्री पाटील-कासोटे यांच्याही आजवरच्या आयुष्यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. महिला प्रकाशकांची या व्यवसायात येण्यापूर्वी आणि स्थिरस्थावर झाल्यावरही चालू असणारी धडपड ‘सत्यकथन’ असल्याने संपूर्ण वर्णनास संदर्भमूल्य आहे. तरीही हे कथन ‘डॅाक्युमेंटरी’ छापाचे कंटाळवाणे होत नाही, हे कथनशैलीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या सर्व प्रकाशिकांची वैयक्तिक पार्श्वभूमी आणि प्रवास वेगवेगळा आहे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे त्या प्रकाशन व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. त्यांची कौटुंबिक माहिती, प्रकाशनकार्यात सहभागी होण्याची कारणे, प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झालेली काही महत्त्वाची पुस्तके अशा संगतवार मांडणीतून माहितीचा पट वाचकांपुढे उलगडला जातो. अनेकदा ही वाट खाचखळग्यांनी भरलेली असूनही वैयक्तिक दुःखांचा, अडचणींचा बाऊ न करता शांतपणे त्यावर मात करणारी विजिगीषू वृत्ती हा एक महत्त्वाचा सामायिक धागा पुस्तकातील महिला प्रकाशकांमध्ये आढळतो. स्त्रीशक्तीच्या असंख्य गुणांपैकी एकाची ही अभिव्यक्ती असावी. छापखान्याचा शोध लावणारा गटेनबर्ग पुरुष असला आणि नंतरची कित्येक शतके छपाई आणि प्रकाशनव्यवस्थेवर पुरूषप्रधान व्यवस्थेचा वरचष्मा असला, तरी ती गोष्ट जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांना लागू होत होती. महत्त्वाची गोष्ट ही, की आज ती परिस्थिती बऱ्याच अंशी निवळत आहे. स्त्री ही पुरुषाची ‘सावली’ राहिली नाही, ती स्वयंप्रकाशित झाली आहे. प्रकाशन व्यवसायात वेगाने मुसंडी मारून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्री प्रकाशकांची नव्याने ओळख करून देणारे ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ हे पुस्तक याची आठवण करून देते. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचे उत्सवी आयोजन केले जाते. त्या गलबल्यात स्त्री-पुरुष अशा सगळ्याच लेखकांच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महिला प्रकाशकांच्या या पुस्तकाची चर्चा खचितच औचित्यपूर्ण ठरेल. गुटेनबर्गच्या सावल्या लेखक - प्रवीण घोडेस्वार प्रकाशक - भाग्यश्री प्रकाशन मूल्य - ₹ २००/- पृष्ठसंखा - ११४ संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'काजवा' म्हणजे अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधणारा बेमालूम संघर्षमय प्रवास! बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Raigad Fort : शिवजयंतीलाच रायगडाची दुर्दशा! शिवरायांच्या समाधीजवळ तुटलेले बॅरिकेट्स कापडी चिंध्यांनी बांधले
- Pune : पुण्यातील लाडक्या बहिणींना गिफ्ट; PMPच्या 31 बसमार्गांवर मोफत प्रवासाची सुविधा
- Nashik : नाशिकमधील धक्कादायक घटना, प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी जीवन संपवलं
- Mumbai : मुंबई-विजयदुर्ग'नंतर जलमार्गांचा विस्तार; दोन नवे थांबे, नेरूळ-मुंबई सेवा अनेक भागांना जोडणार
महाराष्ट्र
- Raigad Accident : जुळ्या बाळांचा नुकताच बाप झालेल्या वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; आनंद साजरा करण्याआधीच काळाचा घाला
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- Pune : पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत देहविक्रयात अडकल्या; चार महिलांची सुटका!
- Pune Crime : पुण्यात तरुण-तरुणी नशेत पोलीस स्टेशनमध्ये राडा, महिला PSIची वर्दी ओढून हाताचा चावा; दोघांनी पोलिसांना धमकी दिली
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


