ICC महिला क्रिकेटला देणार सरप्राईज; पुरुषांप्रमाणे मिळणार मोठ Prize?

आयसीसीचे (ICC) सीईओ गेऑफ यांनी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा (Women's World Cup) जिंकणाऱ्या संघाला आणि पुरूषांचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेतील (Prize Money) मोठी तफावत कमी करण्याचा प्रयत्न आयसीसी करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पुरूष (Men's Cricket Team) आणि महिलांच्या आयसीसी स्पर्धेत विजत्या संघांना मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेतील तफावत येत्या आठ वर्षात (2024 ते 2031) दूर करण्यासाठी योजना आखली जाईल.

गेऑफ पुढे म्हणाले की, 'आम्ही ही योजना आठ वर्षाच्या कालखंडातच राबवण्याचे कारण म्हणजे आयसीसीचे आर्थिक धोरण हे आठ वर्षाचा कालावधी डोळ्यासमोर ठेवूनच केले जाते. या कालखंडात आम्ही महिला आणि पुरूषांच्या स्पर्धांमधील बक्षीस रक्कमेतील मोठी तफावत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.'

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही याबाबतची चर्चा पुढच्या सायकलपासून सुरू करणार आहोत. यात आम्ही महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम आणि पुरूषांच्या आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम यातील तफावत कमी करण्याबाबत प्लॅन तयार करणार आहोत. आम्ही ही रक्कम समान करण्यापर्यंत अजून पोहचलेलो नाही. मात्र त्या दिशेने आम्ही प्रवास सुरू केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply