CSK vs LSG : चेन्नई – लखनौचे लक्ष्य पहिल्या विजयाचे

     

IPL 2022 : मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज-लखनौ सुपर जायंटस्‌ हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत हार सहन करावी लागली आहे. या दोन्ही लढती वानखेडे स्टेडियमवर पार पडल्या होत्या. आता उभय संघ वानखेडेच्या नजीकच्या स्टेडियममध्ये खेळणार आहेत. रवींद्र जडेजाचा चेन्नई सुपरकिंग्ज व के. एल. राहुलचा लखनौ सुपरजायंटस्‌ हे दोन्ही संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिलाच विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरतील यात शंका नाही.

कोलकाता नाईट रायडर्सकडून चेन्नई सुपरकिंग्जला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत महेंद्रसिंग धोनीने आक्रमक फलंदाजी करीत संघाचा डाव सावरला; मात्र ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्होन कॉनवे, अंबाती रायुडू या फलंदाजांना सूर गवसला नाही. या संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. अष्टपैलू खेळाडू मोईन अली याचे संघात पुनरागमन झाले आहे. मोईनसाठी कॉनवे, शिवम दुबे, मिचेल सँटनर यांच्यापैकी एकाला बाहेर बसवण्यात आल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांनाही पहिल्या लढतीत आपला ठसा उमटवता आलेला नाही. ड्वेन ब्राव्हो याने ३ फलंदाज बाद केले खरे, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. तुषार देशपांडे, ॲडम मिल्न, सँटनर, शिवम तसेच जडेजा यांना कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना रोखता आले नाही. मोईन अलीचे पुनरागमन संघासाठी हितकारक ठरू शकते. तसेच अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसही संधीच्या प्रतीक्षेत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply