‘विदर्भाला महत्वाची खाती का नाही?’, भाजपच्या प्रश्नावर अजित पवार म्हणतात…

मुंबई : सरकारचे सद्स्य भाषण द्यायला उभे झाले की काही सद्स्य मध्येच उभे राहतात. आम्ही विदर्भ आणि मराठवाड्याचे विरोधक असल्याचं चित्र निर्माण करतात. पण, आम्ही मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक कामे केले आहेत. आम्ही टप्प्यानं पुढे जायचं ठरवलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत   बोलत होते.

विदर्भाला महत्वाची खाती का देत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. पण, आमच्या काही अडचणी आहेत. त्यामुळे महत्वाची खाती तिकडं नाहीत. आम्हाला जितका पाठिंबा पाहिजे तितका त्या भागातून पाठिंबा मिळत नाही. त्यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांना प्रतिनिधित्व देतो. आमची ताकद पश्चिम महाराष्ट्रात अधिक असल्यानं त्यामुळे इकडं जास्त प्रतिनिधित्व मिळतं, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले.

वैधानिक विकास मंडळाची घोषणा करावी, असं मुनगंटीवार म्हणाले. पण विदर्भाला राज्यपालाच्या निर्देशानुसार जो निधी मिळायला पाहिजे तशा पद्धतीचा निधी दिला जातो. महाविकास आघाडीचे सरकार विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. तसेच मराठवाडा ग्रीड प्रोजेक्टला आमचा विरोध नाही. ३२ वर्ष मराठवाडा आणि विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं. दुर्दैवानं उत्तर महाराष्ट्रातून नेतृत्व एकालाही नेतृत्व मिळालं नाही, असं अजित पवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply