टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाबाबत बरीच चर्चा रंगली होती. ऑस्ट्रेलियाला 3-0 ने मात दिल्याने छाती बेडकीसारखी फुगली होती. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुरूवातीचे दोन सामने जिंकल्याने पार हवेत गेले होते. पण साखळी फेरीतील तिसर्या भारतीय संघाने हवा काढली. त्यानंतर सुपर 8 फेरीत जागा मिळवली. पण या फेरीत निराशाजनक कामगिरी केल्याने उपांत्य फेरीपूर्वीच पत्ता कट झाला. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर पीसीबीचा संताप झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता पाकिस्तान संघाची शस्त्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. इतकंच काय तर पाकिस्तान निवड समितीत असलेल्या अलीम दार यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख सदस्य आणि माजी आंतरराष्ट्रीय पंच अलीम दार यांची ऑक्टोबर 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. इतर काही वृत्तांनुसार, पीसीबीनेच अलीम दार यांना या पदावरून काढून टाकल्याचं सांगितलं जात आहे. आता टी20 संघात काही महत्त्वाचे बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. बाबर आझमचं टी20 क्रिकेट करिअर आता संपल्यातच जमा आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीला टी20 संघात जागा मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरं सलमान आघाकडून कर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित चुकलं.. पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना हा श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवायचं होतं. पण तसं झालं नाही. पाकिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकला. हा सामना पाकिस्तानला किमान 64 धावांनी जिंकायचा होता. त्यासाठी पाकिस्तानने 200 पार धावाही केल्या होत्या. पण सुमार गोलंदाजीमुळे पाकिस्तानला श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्यास अपयश आलं. शेवटच्या षटकात 27 धावांची आवश्यकता होता. यावेळी शाहीन आफ्रिदीने 22 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आणि सलग तीन षटकार मारले. त्यामुळे सामना 2 चेंडूत 5 धावा असा आला. पण दोन्ही चेंडू निर्धाव गेले.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

