दिल्ली : वारकरी संप्रदयाला दिलेल्या खास भेटीबद्दल वारकऱ्यांनी मानले मोदींचे आभार

दिल्ली : मागच्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढपूरात पालखी मार्गाचं भूमिपूजन झालं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात उपस्थिती लावली होती. त्यानिमित्ताने आज वारकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

"संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमीपूजन करुन वारकरी संप्रदायाला भव्य-दिव्य भेट दिल्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळासह आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले" अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे.

पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायन राणे यांच्यासह वारकऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'माझे माहेर पंढरी आहे, भिवरीच्या तीरी' या ओळींच्या जयघोषात करत उपस्थितांना संबोधित केलं होतं. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply