गोव्यात वर्षाला ३ एलपीजी सिलेंडर मोफत! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मंत्रीमंडळाबरोबर काल शपथविधी झाला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. त्यानुसार गोव्यात वर्षाला ३ एलपीजी गॅससिलेंडर मोफत मिळणार आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने सत्तेत आल्यास गोवेकरांना वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळतील असे आश्वासन जाहिरनाम्यात दिले होते. वर्षासाठी महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत, ज्येष्ठ नागरिकांना दयानंद सुरक्षा योजनेखाली मिळणारे मानधन वाढवून ३ हजार रुपये, सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरु करणार, अशी प्रमुख अश्वासने जाहिरनाम्यात दिली गेली होती. त्यामुळे ३ सिलेंडरच्या आश्वासनाची पूर्तता आता होणार आहे. आमच्यासाठी ती केवळ आश्वासने नसून ते जनतेला दिलेले वचन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या अभिभाषण मसुद्यालाही मंजुरी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply