Parliament Winter Session : संभल हिंसाचारावर विरोधक चर्चेवर ठाम; विरोधी खासदारांचा लोकसभेतून सभात्याग

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा अदानी समूहावरील आरोप आणि संभल हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाला. मात्र, मंगळवारपासून संसदेतील कोंडी कमी होऊन संसदेचे कामकाज सुरूच आहे. अदानी प्रकरणावरून आजही विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन ठप्प करून ठेवलेल्या गोंधळाला पूर्णविराम देण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये दोन्ही सभागृहात संविधानावर चर्चा करण्यावर एकमत झाले.

तत्पूर्वी, विरोधी खासदारांच्या गदारोळामुळे गेल्या आठवड्यातील चारही अधिवेशने तहकूब करावी लागली होती. बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आज अर्थमंत्री सीतारामन लोकसभेत मांडू शकतात, असे मानले जात होते, परंतु तसे होऊ शकले नाही. गेल्या आठवड्यात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली, मात्र गदारोळामुळे संसदेचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले. अदानी आणि उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचाराच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात (लोकसभा आणि राज्यसभा) विरोधी पक्षाचे खासदार पुन्हा सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

Parola Accident : लग्न घरात दुःखाचा डोंगर; दोन कारच्या समोरासमोर धडकेत पती-पत्नीचा मृत्य, ४ जण जखमी

गेल्या सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू असताना उपाध्यक्ष जगदीप धनखर आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार वादावादी झाली. या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांच्या प्रत्येकी 19 बैठका होणार आहेत.

संभल हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संभल हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर लोकसभा अध्यक्षांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले. यावर अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. यासोबतच काँग्रेस खासदारांनीही सभात्याग केला. मात्र, नंतर विरोधी पक्षाचे खासदार प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात परतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply