Maharashtra CM : मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल, ५ डिसेंबरला होणार शपथविधी?

Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले तरी देखील राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. महायुतीमध्ये मंत्रीपदाच्या वाटपावरून सध्या वाद सुरू आहेत. राज्याचे नवे मुंख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदी जो निर्णय घेतील हे मान्य असेल असे सांगितले होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार असल्याची चर्चा होती.

अशामध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुंख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबतच स्पष्ट संकेत दिले.

केंद्राकडून जरी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मु्ख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा त्यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मग एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का अशी देखील चर्चा सुरू आहे. पण एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदाबाबत ठाम असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

PMPML Bus : पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल, १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

पक्ष नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पूर्ण पाठिंबा आहेत. मुंबईत तीन नेते जे ठरवतील त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच असावे असे मत अमित शहा यांनी व्यक्त केले. त्याचसोबत पीएम मोदींचे देखील हेच मत आहे असे अमित शहा यांनी बैठकीत सांगितले होते. मुख्यमंत्री पदाचा मुद्दा सुटेल पण आता मंत्रीपद वाटपावरून देखील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून अनेक मतभेद आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा, असे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.

महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ते ५ डिसेंबरला शपथ घेण्याची शक्यता आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. खरं तर हा शपथविधी सोहळा दादरच्या शिवाजीपार्कवर होणार असल्याचे म्हटले जात होते. पण ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरामध्ये गर्दी असणार आहे. याच कारणामुळे शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान निश्चित केले असल्याचे सांगितले जात आहे. या शपथविधी सोहळ्यादरम्यान कोण-कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप निश्चित झाले नाही. तसंच, या समारंभाला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील येतील.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply