राज्यातील सर्व दुकानांवर झळकणार फक्त मराठी पाट्या; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतला.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होतो. त्यामुळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याचीही सातत्याने मागणीही होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाठ्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. तसेच मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.याचे उल्लंघन केल्यास एक लाखापर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. वारंवार उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *