Yuvraj Sambhajiraje Chhatrapati : मतभेद बाजूला ठेवा अन् जबाबदारी घ्या : संभाजीराजे छत्रपतींचे सरकारला आवाहन

Raigad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सर्वमान्य पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. बाहेर गेलो की राजस्थानच्या इतिहासावर महागडी पुस्तक विक्रीस दिसतात पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दर्जेदार पुस्तक मिळत नाहीत अशी खंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. शासनाने पुढाकार घेऊन वादातीत मुद्दे बाजुला ठेवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक दर्जेदार सर्वमान्य पुस्तक प्रकाशित करावे अशी अपेक्षा संभाजीराजेंनी सरकारकडे व्यक्त केली आहे. 

रायगड जिल्ह्यातील 59 किल्ल्यांची ओळख सांगणार्‍या ‘इये देशीचे दुर्ग’ या ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे लिखित पुस्तकाचे प्रकाशन रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनिल तटकरे होते.

Follow us -

संभाजीराजे छत्रपती म्हणाले आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो, त्यांची शिकवण सांगतो, आपले चारशे वर्षांचे इतिहास पाहावे. परंतु शिवरायांविषयी एकही असे ठाेस पुस्तक उपलब्ध नसल्याची खंत राजेंनी व्यक्त केली. सरकारने जबाबदारी घेऊन एक समिती नेमावी त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचे एक सर्वमान्य पुस्तक नागरिकांसमाेर आणावे अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply