Yoga For Sleep: निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची? शांत झोपण्यासाठी करा ही योगासने

Yoga For Sleep: शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप (enough sleep) घेणे खूप गरजेचे असते. मात्र काही लोकांना खूप प्रयत्न करून देखील झोप लागत नाही. या समस्येला निद्रानाश (Insomnia Problem) असे देखील म्हटले जाते. या समस्येमुळे शरीरात ऊर्जेची कमतरता भासते आणि पुरेशी झोप मिळत नाही. परंतु काही योगासने केल्यास तुम्हाला शांत झोप (Yoga for Insomnia) लागू शकते. योगासने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. काही योगासने असे देखील आहेत ज्यामुळे शांत झोप (Yoga For Better Sleep) लागते. ही योगासने तुमचा तणाव कमी करून मनाला आराम देतात आणि लवकर झोपायला मदत करतात. ही सर्व योगासने करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटे लागतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांविषयी माहिती देणार आहोत.

वज्रासन (Vajrasana)

ताबडतोब झोप लागण्यासाठी वज्रासन अतिशय फायदेशीर असते. हे आसन करण्यासाठी बेडवर गुडघ्यावर बसा. बसताना लक्षात ठेवा की तुमचे शरीर बाहेरील बाजूस वळवावे आणि पंजे मागील बाजून मोकळे सोडावे. वज्रासनात कंबर, मान आणि छाती समोर ठेवा आणि 2 ते 3 मिनिटे दीर्घ श्वास घ्या.

अधोमुख वीरासन (Adho Mukha Virasana)

निद्रानाशाची (insomnia) समस्या दूर करण्यासाठी अधोमुख वीरासन हे आणखी एक महत्त्वाचे योगासन आहे. अधोमुख वीरासन करण्यासाठी वज्रासनाच्या आसनात गुडघे थोडेसे रुंद करावे आणि कंबर, मान सरळ ठेवून नजर समोरच्या दिशेने ठेवा. छाती जमिनीच्या दिशेने न्या आणि दोन्ही हात पुढे पसरवून जमिनीवर ठेवा. 2 ते 3 मिनिटे या स्थितीत राहा. कंबर आणि मणक्यामध्ये तणाव जाणवू द्या. परंतु शरीर खाली झुकणार नाही याची काळजी घ्या.

जानु शीर्षासन (Janusirsasana)

शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी जानु शीर्षासन करु शकता. जानु शीर्षासन करण्यासाठी बेडवर बसून उजवा पाय समोर पसरवा. यानंतर डावा तळवा उजव्या मांडीजवळ किंवा ओटीपोटाजवळ ठेवा. पोटाचा खालचा भाग उजव्या गुडघ्याकडे वाकवून उजव्या पंजाकडे वाका. लवकर झोप येण्यासाठी तुम्ही ही योगासनेही उशीचा आधार घेऊनही करू शकता. तुम्ही उजवा गुडघा आणि माथ्याच्या मध्ये उशी ठेवू शकता. हेच आसन दुसऱ्या पायाने पुन्हा करा.

सुप्तबद्ध कोनासन (Supta Baddha Konasana)

निद्रानाशची समस्या दूर करण्यासाठीवर झोपण्यापूर्वी सुप्तबद्ध कोनासन करू शकता. हे आसन तुमच्या शरीरातील तणाव दूर करण्यास मदत करते. हे योगासन करण्यासाठी बेडवर बसून दोन्ही तळवे एकत्र आणा आणि घोट्याला शक्य तितक्या आपल्या दिशेने आणा. आता पलंगावर कमरेच्या मागे गोल उशी ठेवा आणि हळू हळू उशीवर झोपा. लक्षात ठेवा की तुमची छाती वरच्या दिशेने असावी आणि नजर खाली असावी. यासाठी तुम्ही डोक्याखाली दुसरी उशी ठेवू शकता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply