Yewla Crime : भाऊबंदकीचा वाद उफाळला, लाठ्या-काठ्यांनी मारहाण; १४ जणांवर गुन्हे दाखल

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील न्याहरखेडा येथील मुलतानी वस्तीवर येथील भाऊबंदकी मध्ये वाद उफाळून आला होता. या वादातून लाठ्या- काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये आठ जण जखमी झाले आहे. दरम्यान वाद पोलिसात गेल्यानंतर या प्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात येणाऱ्या न्याहरखेडा या गावात सदरची घटना घडली आहे. दरम्यान भाऊ बंदकीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. यातच बुधवारी सुमय्या मुलतानी यांच्यासह घरामागील कांदा चाळीत घरातील सर्व कांदा निवडत होते. याच वेळी पाठीमागून टोळी स्वरूपात भाऊबंद आले व त्यांनी मोठमोठ्या लाठ्या काठ्यांनी तसेच मिळेल त्या वस्तुंनी मारहाण करण्यास सुरवात केली.

आठ जणांना जबर मारहाण

कांदा चाळत असलेल्या बेसावध परिवारावर अचानक करण्यात आलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. घरात कांदा चाळत असताना सोमय्या मुलतानी, जावेद मुलतानी यांच्यासह ८ जणांना जबर मारहाण केली आहे. तर या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून जखमींना येवल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

१४ जणांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या वादातून अचानकपणे करण्यात आलेल्या हल्ल्याने मुलतानी कुटुंब हादरले आहे. तर घडल्या प्रकाराबाबत मुलतानी परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या बाबत येवला तालुका पोलिसात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply