Yawal Fire News : प्राचीन श्रीराम मंदिरासह बँकेला आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Yawal Fire News : गावात असलेल्या प्राचीन श्रीराम मंदिराला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळच्या जळगाव जिल्हा बँक शाखेच्या कार्यालयाला देखील आग लागल्याने गावात धावपळ उडाली. आगीत राम मंदिर व बँकेचे नुकसान झाले असून अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या आमोदा गावात प्रभू श्रीरामांचे प्राचीन मंदिर आहे. दरम्यान या मंदिराला २ मे रोजी रात्री दहा वाजेनंतर अचानक शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. आग इतकी पसरली की मंदिराच्या वर असणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग झपाट्याने पसल्यामुळे नियंत्रण मिळविता आले नाही. यानंतर अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. 

Maval News : अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

आठ अग्निशमन बंब दाखल 
यानंतर फैजपूर, सावदा, रावेर, यावल, भुसावळ या ठिकाणाहून आठ अग्निशमन बंबांच्या साहाय्याने पहाटे दोन वाजेपर्यंत आग आटोक्यात आणून विझवली. आगीमध्ये मंदिर आणि बँक दोघांचे अंदाजे २ लाखांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply