Yavatmal News : यवतमाळमध्ये विषबाधा; 19 भाविक आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल, 3 चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी नाईक या दोन गावात मंगळवारी रात्री एका धार्मिक कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर आज सकाळी पुन्हा काही लाेकांनी कालचेच म्हणजे शिळे अन्न खाल्ले. त्यातून तब्बल 19 जणांना विषबाधा झाली. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान.विषबाधा झालेल्यांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सध्या ग्रामीण रूग्णालयात डाॅक्टरांची धावपळ दिसून येत आहे. तीन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत सहा महिला तर 13 पुरूषांना विषबाधा झाली आहे. सर्वांवर उपचार सुरु आहेत.

Pune Ink Attack : कोर्टाबाहेर भावनांचा उद्रेक, विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न, वातावरण तापलं

या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

१) भारत संतोष जाधव (वय 21)

२) भारती गणेश राठोड (वय 30)

३)निर्मला दिलीप जाधव (45)

४) दिलीप रामसिंग जाधव (50)

५) नम्रता गणेश राठोड (08)

६) निलेश दिलीप जाधव (35)

७) जगदीश राठोड (22)

८) उकंडा सूर्यभान राठोड (40)

९) उदयसिंग श्रीराम चव्हाण (34)

१०) बेबी उकंडा राठोड (45)

११) पल्लवी गजानन जाधव (35)

१२) किरण निलेश जाधव (33)

१३) गजानन प्रल्हाद जाधव (28)

१४)सुरेखा बाबुलाल राठोड (35)

15) प्रगती संतोष जाधव (19)

16) भारत हरीचंद जाधव (32)

17) दर्पण भारत जाधव (06)

18) विजू गणेश जाधव (07)

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply