Yavatmal News : कोळसा खदाणीमुळे वणी तालुक्याला राज्यभरात ओळखले जाते. परंतु, आता वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यात मटका, जुगार, खुले आम सुरू असून, याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलाय. याबाबत वणी पोलीस आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः या मटका अड्ड्यावर धाड टाकून या सर्व प्रकाराची पोलखोल केलीय.
दिवसभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीला उत येत आहे. असे असताना असे प्रकार खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे का लक्ष देत नाही, असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे आतातरी मटका ,जुगार सारखे अवैध धंदे बंद होणार का, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
|
भाजप आमदार स्वत:च मटका अड्ड्यावर धाडीसाठी पोहोचले!
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात मोठ्याप्रमाणात कोळसा खदान आहेत. त्यामुळे राज्यासह परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. दिवसभर मोलमजूरी करून मिळालेल्या पैशातून मटक, जुगार, सट्टा, इत्यादि अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. परिणामी, यातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याची शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. अलिकडेच जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. हे प्रकरण ताजे असताना जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. अशाच एका जुगार अड्ड्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
तुरुंग अधिकार्यासह कर्मचाऱ्यांला आठ न्यायाधीन बंद्यांची मारहाण
यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने 8 न्यायाधीन बंद्यांनी चांगलाच राडा घातलाय. यात तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे आणि कर्मचारी सुरज मसराम यांना जबर मारहाण केलीय. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची ही खळबळजनक घटना यवतमाळच्या कारागृहात घडलीय. दरम्यान, कारागृह अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात आठ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओंकार कुंडले, जुनेद फारुक शेख, सतपाल रुपनवार, नैनेश निकम, आकाश भालेराव, सोहेल मेहबूब बादशाह शेख, मनोज शिरशीकर, नामदेव नाईक अशी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत.
शहर
- Ghatkopar Station : लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाने जीव गमावला, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
- Ghatkopar Railway station : दुर्दैवी! मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू
- Pune Rain : पावसापासून वाचण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहिले, अचानक वीज पडली अन्... पुण्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
- Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, भर रस्त्यात वेगात येणाऱ्या कारनं चिरडलं अन्...; लेकीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
महाराष्ट्र
- Kolhapur : कोल्हापुरात बेंदूर सणात गोंधळ! बैल सुटल्याने लोकांची एकच धावपळ; काही जण जखमी
- Ahmedabad Airplane Crash : 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत
- Maharashtra Weather Update : पुढचे २४ तास महत्वाचे! मुंबई, ठाण्यासह पुण्याला पाऊस झोडपून काढणार, कोकणात रेड अलर्ट
- Jalna News : अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून ३५ कोटी हडपले, जालन्यातील १० तलाठ्यांचे निलंबन
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Pune : पिंपरी चिंचवडच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू, 'बकरी ईद' कुटुंबियांसोबतचा ठरला अखेरचा सण
- Air India Emergency Landing : अहमदाबाद अपघाताच्या २४ तासांत एअर इंडियाच्या AI 379 विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
- Ahmedabad : विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर्सची हृदयद्रावक कहाणी; निवृत्त होणारे पायलट अन् नुकतंच रुजू झालेल्या दोघांसह १२ क्रू मेंबर्सचा मृत्यू
- Ahmedabad : अहमदाबाद विमान दुर्घटनेत सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक अपघातग्रस्त