Yavatmal Crime : युवकानं अंगावर पेट्राेल ओतून घेतल्याने पंचायत समिती कार्यालयात उडाला गाेंधळ

Yavatmal Crime : घरकुल करिता असलेला हप्ता मिळत नसल्याने आज (बुधवार) एका युवकाने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीमध्ये स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गटविकास अधिकारी यांनी वेळीच हस्तक्षेप करुन युवकाची समजूत काढली अन्यथा पंचायत समितीत आज दुर्दैव घटना घडली असती.
 
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : संतोष उकंडराव बुटले (राहणार माळेगाव तालुका आर्णी) याचे वडील उकंडराव विश्वनाथ बुटले यांना घरकुल याेजनेतून घर मिळाले. त्यासाठीचा पहिल्या हप्ता 15 हजार रूपये बुटले यांना मिळाला. मात्र दुसरा हप्ता देण्यास पंचायत समिती मधील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे बुटलेंनी म्हटलं.

वडिल वयोवृद्ध असल्याने ये-जा करणे त्यांना शक्य नव्हते. तसेच ते थकल्याने दूसरा हप्ता मिळावा यासाठी संताेष बुटले याने पाठपुरावा सुुरु ठेवला. मात्र त्यात अपयश येत असल्याचे संताेष याच्या लक्षात आले.संताेष याने वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत असल्याचा दावा करीत आज टोकाचं पाऊल उचलले. गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातच त्याने पेट्रोल अंगावर आेतून घेत स्वत: ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गटविकास अधिकारी आर.आर.खरोडे यांनी वेळीच हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान घरकुलच्या हप्ता खात्यात जमा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असल्याची आरोप संताेष बुटले यांनी केला.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply