Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाची मोठी कारवाई; मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी

Mumbai : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणाने राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शहा हे शिंदे गटातील अधिकारी आहेत. यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून शिंदे गटाला लक्ष्य केले जात आहे. यानंतर शिंदे गटाने मिहीर शहा याच्या वडिलांवर मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटाने मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मुंबईत वरळीत झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी मिहीर शाहने कार चालवत महिलेला धडक दिली. अपघातानंतर त्याने महिलेला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. तर या अपघातात महिलेचा पतीही जखमी झाला. या भीषण अपघातानंतर महिलेने घटनास्थळावरुन पळ काढला.

Pimpri Chinchwad Corporation : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या टेंडर घोटाळ्याची ईडीकडून दखल

या भीषण अपघात प्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली होती. २४ वर्षीय मिहीर शाहला मंगळवारी अटक करण्यात आली. पण कोर्टाने राजेश शहाला जामीनही मंजूर केला. आज त्यांच्याविरोधात पक्षाने मोठी कारवाई केली आहे.

राजेश शाह हे शिंदे गटाचे उपनेते होते. राजेश शाह यांच्या मुलाने रविवारी सकाळी दाम्पत्याला उडवले होते. राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाहने महिलेला फरफटतही नेलं होतं. या भीषण प्रकारात महिलेचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर मिहीरने वडील राजेश शाहला फोन केला होता. त्यानंतर राजेश शाह यांनी मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच कारचालक राजऋषी बिडावत याला जबाबदारी घेण्यास सांगितल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी राजेश शाह आणि ड्रायव्हर राजकृषीला अटक केली होती. त्यानंतर राजेश शाहला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर ड्रायव्हरला पोलीस कोठडी सुनावणी आली होती. या प्रकरणी कोर्टाने राजेश शाह यांची अटक बेकायदेशीर ठरवली होती. त्यानंतर कोर्टाने राजेश शाह यांना जामीन मंजूर केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply