Worli : वरळीत अग्नितांडव! शो रूमला भीषण आग, आग विझवताना अग्निशमन दलाचा जवान जखमी

Worli : मुंबईच्या वरळीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. गांधी नगरमधील भारत बाजार परिसरातील मार्शल शोरूमच्या गोदामाला भीषण आग लागली होती. ही आग पहाटे साडेचारच्या सुमारास लागल्याची माहिती आहे. या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. आग विझवताना मात्र, दुर्घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला असून, यात लाखोंचं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १७ मे रोजी पहाटे साडेचार- पाच वाजेच्या सुमारास शोरूमला आग लागली. भारत बाजार परिसरातील गोदामात अचानक आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. सकाळी ५ वाजता या आगीला 'लेव्हल १' ची आग म्हणून जाहीर करण्यात आलं. सुमारे ९०० चौरस फूट क्षेत्रफळात ही आग पसरली होती.

Badlapur News : बदलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार! २६० कोटींची पाणीपुरवठा योजना

ही आग पसरताच काही क्षणात धुराचे लोट पाहायला मिळाले. या गोदामात विद्युत यंत्रणा, कागद, गिफ्ट बॉक्सेस, सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी साहित्य, कपडे, संगणक, लाकडी दरवाजे यांसारख्या वस्तू साठवलेल्या होत्या. सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. सकाळी ७.१२ मिनिटांनी आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

आग विझवताना अग्निशमन दलातील अजिंद्र गणपत सावंत या जवानाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply