World Cup Final 2023 : टीम इंडिया, विजयी भव! ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वविजयी होण्यासाठी 'रोहित सेना' सज्ज

World Cup Final 2023 : २०२३ च्या विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. संपूर्ण विश्वचषकात अजिंक्य कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात एकदम थाटात एन्ट्री केलीय. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना होईल. अवघ्या देशाचे या सामन्याकडे लागले असून कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एकहाती वर्चस्व गाजवताना साखळी फेरीतील नऊ आणि उपांत्य फेरी असे एकूण १० सामने जिंकले आहेत. आज या विश्वचषकातील अंतिम सामना होणार असून बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषकावर नाव कोरण्यास रोहित सेना सज्ज झाली आहे. दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल.

IND Vs AUS Final : फायनलपूर्वी रोहित-कमिन्सने ट्रॉफीबरोबर काढले फोटो, जाणून घ्या ‘त्या’ ऐतिहासिक ठिकाणाबद्दल

हा ऐतिहासिक सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होत असून यामध्ये 130,000 प्रेक्षक सामना पाहू शकतात. याआधी वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर १९८३ आणि २०११ साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. विशेष म्हणजे तब्बल २० वर्षांनी भारत आणिऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमने सामने येत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ...

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झँम्पा, कॅमरून ग्रीन, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅलेक्स कॅरी, शॉन अ‍ॅबट.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply