Womens Reservation Bill : महिला आरक्षण राजीव गांधींचे स्वप्न, विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा: सोनिया गांधी

Womens Reservation Bill : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर आज चर्चा सुरू झाली आहे. आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते या विधेयकावर चर्चा करणार आहेत. तर यावेळी बोलताना काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा देत असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

Ayodhya Ram Mandir Threat Call : अयोध्येतील राम मंदिर बाॅम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत बोलताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, 'महिला आरक्षण हे माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते. नंतर ते पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने मंजूर केले. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होणार आहे.'

पुढे बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, 'स्त्री ही आपल्या महान देशाची जननी आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आहेत. स्त्री हे त्यागाचे प्रतिक आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचे मोजमाप करणे कठीण आहे. स्त्रियांमध्ये समुद्रासारखा संयम असतो. महिला आरक्षण विधेयक सर्वप्रथम काँग्रेसने मंजूर केले. या विधेयकाला माझा पाठिंबा आहे,'


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply