IPL 2024: कोण आहे अंशुल कंबोज? MIच्या या खेळाडूचे नाट्यमय पदार्पण, हेडला त्रिफळाचीत केलं पण…

Who is Mumbai Indians Debutant Anshul Kamboj: मुंबई इंडियन्स हैदराबादविरूद्ध वानखेडेवर सामना खेळत आहे. या सामन्यात मुंबईकडून नव्या चेहऱ्याला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबईने अंशुल कंबोजला हैदराबादविरूद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. अंशुल कंबोजने पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेटही मिळवली. अंशुलच्या नावे पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट्सही झाले असते, तर हेडला क्लीन बोल्ड करणारा गोलंदाज अशीही त्याची ओळख होता होता राहिली, अंशुलचे पदार्पण एकूणच खूप नाट्यमय होते, पण हा मुंबईचा नवा शिलेदार आहे कोण?

२३ वर्षीय कंबोज हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. अंशुल हा कर्नाल, हरियाणाचा आहे आणि तो यापूर्वी भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळला आहे. नमन धीरनंतर या मोसमात मुंबईसाठी पदार्पण करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. अंशुल कंबोजने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. ज्यात त्याने १० सामन्यात १७ विकेट घेतल्या.

IPL 2024 Playoffs : मुंबईने हैदराबादविरूद्ध विजय मिळवल्यास ‘या’ ६ संघांसाठी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या समीकरण

अंशुल कंबोजच्या चेंडूवर हेड क्लीन बोल्ड पण…

पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येक गोलंदाज आपल्या खेळीने छाप पाडण्याचा प्रयत्न करतो, अंशुलनेही आजच्या सामन्यात अगदी तेच केलं, त्याला पहिली विकेट मिळाली खरी पण त्याच्या दोन मोठ्या विकेट्स हुकल्यानंतरच. अंशुलने त्याच्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेडला क्लीन बोल्ड केले. पण अंशुलचं नशीब खराब म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण तो नो बॉल ठरला आणि अंशुलला मोठी विकेट मिळता मिळता राहिली. त्यानंतर त्याच्या पुढील षटकात पुन्हा एकदा हेडला झेलबाद करण्याची संधी आली. हेडने त्याच्या चेंडूवर थर्ड मॅनवर षटकार लगावला. तिथे तुषारा हजर होता पण त्याने मात्र झेल सोडला. अशारितीने हेड नाबाद राहिला.

पण अंशुलने त्याच्या पुढील षटकात मयंक अग्रवालला क्लीन बोल्ड करत आपली पहिली विकेट मिळवली. आयपीएलमधील पहिली विकेट मिळवल्याचं त्याने शानदार सेलीब्रेशन केलं. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचे फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकले नाही.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply