IPL 2024: राज्याचा संघ सोडला, युवराजचा रेकॉर्ड मोडला अन् आता पंजाबचा तारणहारही ठरला; कोण आहे अशुतोष शर्मा?

Who is Ashutosh Sharma: पंजाब किंग्सला इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 17 व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवून देण्यात अशुतोष शर्माने मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात गुजरातने पंजाबसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अशुतोष आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी पंजाबला 27 चेंडूत 50 धावांची गरज होती. यावेळी एका बाजूने शशांक सिंग खेळत होता.

त्याला अशुतोषने तोलामोलाची साथ दिली. या दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी 22 चेंडूत 43 धावांची भागीदारी झाली, ज्यात अशुतोषने 31 धावांचे योगदान दिले. त्यामुळे पंजाबला विजय मिळवणे सोपे झाले. त्याने अशुतोषने 18 व्या षटकात 3 चौकार मारले होते. त्यामुळे सामना पंजाबच्या बाजूने झुकला.

GT Vs PBKS IPL 2024 : पंजाबचा संघ पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळणार? अहमदाबादमध्ये आज गुजरात टायटन्सशी लढणार

अखेर 7 धावा बाकी असताना तो बाद झाला. पण तोपर्यंत पंजाबसाठी विजय अगदी सोपा झाला होता. अखेरच्या षटकात अर्धशतक केलेल्या शशांकने पंजाबसाठी विजयी धाव घेतली.

दरम्यान 25 वर्षीय अशुतोष सध्या रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. खरंतर तो मध्यप्रदेशचा असून त्याचा जन्म रतलाममध्ये झाला होता. तो लहानचा मोठा इंदूरमध्ये झाला. तेथील स्थानिक खेळाडू असलेला नमन ओझा त्याचा आदर्श होता. नमन भारतासाठीही क्रिकेट खेळला आहे.

अशुतोषने मध्यप्रदेश संघाकडूनच 2018 मध्ये पदार्पण केले होते. मात्र मध्यप्रदेश संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी चंद्रकांत पंडित यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अशुतोषला संघात संधी दिली नाही, असे अनेक मीडिया रिपोर्ट्स सांगतात. त्याचमुळे अखेर अशुतोष मध्यप्रदेश संघ सोडून रेल्वे संघात सामील झाला. तो आता रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे.

युवराजचा तोडला विक्रम

अशुतोष गेल्यावर्षी प्रकाशझोतात आला होता. त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेशविरुद्ध रेल्वेकडून खेळताना 11 चेंडूतच अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे तो युवराजचा विक्रम मोडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

युवराजने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक केले होते. अशुतोषने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या त्या सामन्यात 12 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 8 षटकारांची बरसात केली होती.

अशुतोषची कारकिर्द

अशुतोषने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 4 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 268 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. तसेच त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 7 सामन्यांत 56 धावाच केल्या आहेत, तर 16 टी20 सामन्यांत त्याने 4 अर्धशतकांसह 450 धावा केल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply