IPL 2024 Playoffs : मुंबईने हैदराबादविरूद्ध विजय मिळवल्यास ‘या’ ६ संघांसाठी ठरणार फायदेशीर, जाणून घ्या समीकरण

Which teams will benefit from MI’s win against SRH : आयपीएलचा १७वा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज ६ मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. संघाला ८ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई आजचा सामना हरल्यास प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या विजयाचा फायदा गुणतालिकेतल्या या ६ संघांना होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर विराजमान –

आयपीएल २०२४ मध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघाने १० सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि १२ गुण आहेत. संघ चौथ्या क्रमांकावर आहे. जर संघाने आजचा सामना जिंकला तर त्याचे १४ गुण होतील. या स्थितीत इतर संघांना प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. पण हैदराबादचामुंबई विरुद्झ पराभव झाल्याल्यास गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज,  आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स,  चेन्नई सुपर किंग्ज  आणि लखनऊ सुपर जायंट्सला फायदा होऊ शकतो. या संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. सर्वप्रथम, हैदराबादचे ११ सामने होतील आणि त्यांचे गुण केवळ १२ राहतील. दुसरा, ज्या सहा संघांना फायदा होईल. त्यांनी ११-११ सामनेही खेळले आहेत.

रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान भारताच्या महिला, पुरुष संघांना यश

चेन्नई सुपर किंग्ज –

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत आणि पाच सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा संघ सध्या १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे सीएसके संघ तिसऱ्या क्रमांकावर राहील. हैदराबाद जिंकल्यास एका स्थानाने खाली घसरेल.

लखनऊ सुपर जायंट्स –

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत. पाच सामन्यांत पराभव झाला असून संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. संघाची निव्वळ धावसंख्या उणे ०.३७२ आहे. जर हैदराबाद हरले तर त्याचे सामने ११ होतील, परंतु गुण फक्त ११ राहतील. एलएसजीचीही तीच परिस्थिती आहे. त्यानंतर लखनऊ संघाला आपला पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.

दिल्ली कॅपिटल्स –

दिल्ली कॅपिटल्स संघाने ११ सामन्यांतून ५ जिंकले असून त्यामुळे त्यांचे १० गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी, अव्वल संघांनी त्यांचे सामने गमावणे आवश्यक आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्धचासामना गमावल्यास दिल्लीसाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

आरसीबी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स –

आरसीबी, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत ४-४ सामने जिंकले आहेत. या सर्व संघांचे ८-८ गुण आहेत. हे संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मग त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनरायझर्स हैदराबादने त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावावेत. ज्याची सुरुवात आजच्या सामन्यापासून होऊ शकते. कारण हैदराबादचे सध्या १२ गुण आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply