IND vs USA सामना पावसामुळे रद्द झाला तर... पाकिस्तानचे देव पाण्यात, जाणून घ्या समीकरण

What happens to Group A Super 8 qualification scenarios : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. जो संघ जिंकेल तो सुपर-8 साठी पात्र ठरेल. त्यामुळे भारत आणि अमेरिका या दोघांनाही आजचा सामना जिंकायचा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या नजराही या सामन्यावर लागल्या आहेत. या सामन्याचा निकाल त्यांच्यासाठीही खूप महत्वाचा आहे.

मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोणाला फायदा होईल असा प्रश्न चाहत्याच्या मनात आहे.
याआधी पावसाने भारत-पाकिस्तान सामन्यात व्यत्यय आणला होता. म्हणूनच भारत-अमेरिका सामन्यादरम्यान पाऊस पडेल की नाही हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जर आपण न्यूयॉर्कच्या हवामानाबद्दल बोललो तर 12 जून रोजी 25 टक्के पाऊस अपेक्षित आहे.

Team India : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियासमोर नवे संकट; BCCIनं उचललं मोठं पाऊल

पण, न्यूयॉर्कच्या हवामानाबद्दल काहीही सांगता येत नाही, कारण येथे हवामान कधीही बदलते. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही 30-40 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र तरीही पावसाने सामना विस्कळीत केला.

अशा परिस्थितीत जर पाऊस पडला आणि त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला, तर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील आणि पाकिस्तानचा संघ बाहेर पडेल. कारण भारत आणि अमेरिका या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळून त्यांचे 5 गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरीही ते केवळ 4 गुणापर्यंत पोहोचू

शकतील आणि स्पर्धेतून बाहेर पडतील.
या कारणामुळे आजचा सामना पूर्ण व्हावा आणि भारतीय संघाने अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा अशी पाकिस्तानची इच्छा आहे. भारताने अमेरिकेला एकतर्फी हरवले तर पाकिस्तानसाठी सुपर-8 चे दरवाजे उघडतील. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर पाकिस्तानच्या इच्छाही धुळीस मिळतील



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply