Weather Update : महाराष्ट्र-कर्नाटकसह 'या' राज्यांत पावसाची शक्यता; IMD चा सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात , तर पुढील 4 दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची फारशी शक्यता नाही. तापमानात हळूहळू वाढ होईल. शनिवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.'

महाराष्ट्रात पावसाची शक्यता

आज मुंबई, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी इथं काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *