Weather Update : महाराष्ट्रासह ५ राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठा बदल

Weather Update : मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ हवामान तर कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे. उत्तर भारतात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे थंडीची लाट कायम राहणार असून थंडीचा आणखीच कडाका जाणवणार आहे. दक्षिणेकडे मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Bhima-Koregaon : कोरेगाव-भीमा येथे लोटला जनसागर; विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची अलोट गर्दी

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील १७ तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण २२ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

पुढील आठवडाभरात या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवेल, तर काही जिल्ह्यांमध्ये दाट धुके पडणार, असंही आयएमडीने म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply