Weather Update : पुणे, मध्य महाराष्ट्रासह 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतही 25 आणि 26 नोव्हेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे. यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासह सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चिमुकलीसह तिघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

रविवारी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील चार दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात आकाश मुख्यतः ढगाळ आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता तर दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *