
Weather Update : राज्यासह देशात गुलाबी थंडी चाहूल लागली आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला दिसत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता
आज महाराष्ट्रासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. सिंधुदुर्ग,कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना वायू प्रदूषणामध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
|
|
येत्या 5 दिवसांत दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 11 नोव्हेंबरपर्यंत येथे पाऊस संपण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, ओडिशा आणि गोव्यातही पाऊस पडू शकतो.
'हिमाचल प्रदेशात 8 नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी होणार'
आजपासूनच जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याच वेळी, हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवर्षावाचा कालावधी 8 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर उत्तराखंडमध्ये 9 आणि 10 नोव्हेंबरला पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये 9 नोव्हेंबरपासून हलका पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तर मध्य आणि पूर्व भारतात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे
9 नोव्हेंबरपर्यंत पावसाची अंदाज
पुढील दोन दिवस देशातील काही भागात पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबरला जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

