Weather Update : विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. यावेळी अनेक ठिकाणी सध्या उन्हाचा कडाका जाणवतोय. तर अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. यातच आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत  आहे. त्यामुळे हवामान विभागाने आजपासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

Mumbai News : राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचतगटांशी जोडण्यात येईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट

सध्या पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग आणि तामिळनाडू ते विदर्भाच्या काही भागापर्यंत कमी दाबाचा विरळ पट्टा तयार होत आहे. त्यामुळे विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट  आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील भंडारा, अमरावती, नागपूर गोंदिया, तसंच यवतमाळ या जिल्ह्यांत 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता  वर्तवण्यात आलीय. त्यामुळं आता शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. अगोदरचं अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply