Weather Update : भर उन्हाळ्यात यंदा पडणार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

Weather Update :  राज्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदाचा उन्हाळा काहीसा कडक असेल, असाही हवामानाचा अंदाज आहे.मार्च महिन्यातले तीन दिवस ४ ते ६ मार्च या कालावधीत हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच पारा चाळिशीजवळ गेला होता. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर सहा मार्च रोजी विदर्भामध्ये सगळीकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातल्या तापमानात मात्र विशेष घट होत नसल्याने सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सियसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे अतिशय कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply