Weather Update : नववर्षात येणार गुलाबी थंडीची लाट, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर राजस्थान या राज्यात या लाटेचा प्रभाव असेल

Weather Update: तापमानातील चढ उतारामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात बदल होताना दिसत आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसची तयारी सुरू असतानाच आता देशामध्ये गारठा वाढणार असल्याचे दिसत आहे. ख्रिसमसनंतर तापमामनात घट होणार असल्याने थंडी वाढणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, देशभरात ख्रिसमस आणि नववर्षाची जय्यत तयारी सुरू असतानाच थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. २३ डिसेंबरपासून ही लाट येऊ शकते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर राजस्थान या राज्यात या लाटेचा प्रभाव असेल. त्याचबरोबर थंड हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही या राज्यांमध्ये वर्तवला आहे.

याशिवाय केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिसासह महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात देशातील इतर भागात हवामान कोरडे राहील तसेच इशान्य भारतातील बिहार आणि पुर्व उत्तरप्रदेशमधील काही भागात धुके पडण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने मागच्या २४ तासात धुळे येथील कृषी महाविद्यालयात निच्चांकी 10 अंश, मराठवाडा कृषी विद्यापीठात 10.1 अंश, औरंगाबाद 10.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये सकाळी आठ वाजता तापमान आठ अंशापर्यंत घसरले. राजधानीत दिल्लीमध्ये ज्या प्रमाणे तापमान घसरत आहे त्यावरुन नागरिकांची चिंता वाढवली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply